
सावंतवाडी : सावंतवाडीतील गुळदुवे येथील ग्रामदैवत श्री देव विरेश्वर सातेरी वार्षिक जत्रौत्सव कार्तिक शुद्ध प्रतिपदेस शनिवार , दि. 16 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी धार्मिक विधींना सुरुवात होईल. त्यात श्रींना महाअभिषेक, केळी ठेवणे, ओट्या भरणे, गाऱ्हाणी, आदी विधी होतील.
रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य श्रींची पालखी मिरवणूक निघेल. रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळ ,आरवली-वेंगुर्ला यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.