
वैभववाडी : वेंगसर गावचे माजी सरपंच तथा संविधान सैनिक जिल्हा प्रमुख सुभाष कांबळे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेत प्रवेश केला. श्री.राऊत यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले.
वैभववाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सभागृहात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा होता. यावेळी श्री.कांबळे यांनी सेनेची मशाल हाती घेतली. श्री.कांबळे यांनी वेंगसर गावचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. तसेच ते संविधान सैनिक सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुजन समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे शिवसेनेची आणखी ताकद वाढली आहे.