निर्व्हाळ गावात साकारला शिवनेरी किल्ला !

Edited by: मनोज पवार
Published on: November 05, 2024 18:35 PM
views 271  views

चिपळूण : तालुक्यातील निर्व्हाळ, मधलीवाडीतील जय भवानी जय शिवाजी मंडळाच्या मुलांनी गावात दिवाळी निमित्ताने किल्ले शिवनेरी साकारला.

छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची माहिती आणि इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी , मंडळाचा तरुण कार्यकर्ता विराज राजेश मयेकर याने शिवनेरी किल्ला आणि प्रतिकृतीद्वारे इतिहास मांडण्याची कल्पना मांडली. विराज ला साथ देत मंडळातील, धिरज पवार, अमेय तावडे, सुजल सावंत, निहार पवार,सर्वेश सावंत,गंधर्व जाधव,विनोद सावंत ,राजेश मयेकर, वेदांत चव्हाण,साहिल सावंत आदी सर्वांनीच कामाला सुरुवात केली. 

दगड, माती, रंग आदी गोळा करत चार पाच दिवसांत किल्ला तयार ही झाला. किल्ल्याची मांडणी करताना महादरवाजा, शिवाई मंदिर, अंबरखाना, बदामी तलाव, कडेलोट, ईदगा, कोळी चौथरा,पाण्याचा हौद,शिवाजी महाराज जन्मस्थान आदी विविध स्थळांची मांडणी करून माहिती देण्यात आली आहे. ही ऐतिहासिक प्रतिकृती आणि इतिहास जाणून घेण्यासाठी निर्व्हाळ रामपूर मालघर परिसरातील नागरिक, तरुण, मुले गावात भेट देत आहेत.