
सावंतवाडी : खासकीलवाडा येथील विठ्ठल उर्फ अवि बाळकृष्ण परब, (वय 27 ) या युवकाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. सकाळी हा मृतदेह आढळून आला.
काल सकाळी घरातून निघालेला विठ्ठल घरी परतलाच नाही. आज सकाळी मोती तलावाच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व्यक्तींना मोती तलावाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. लागलीच नागरिकांनी पालिका व पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मोती तलावात बोटिंगद्वारे मृतदेह बाहेर काढला असता मृतदेहाची ओळख पटली. यावेळी राजू धारपवार, सुधन आरेकर आदी घटनास्थळी दाखल होते. मोती तलावात तोल जाऊन पडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.