वराडमध्ये प. पू. श्री राणे महाराज मठात होणार भक्त निवास - हॉलची उभारणी

वैभव नाईक यांनी निधी केला मंजूर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 08, 2024 14:24 PM
views 224  views

सिंधुदुर्गनगरी :  आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत  प. पू. श्री राणे महाराज मठ कुसरवे -वराड येथे भक्त निवास आणि हॉलचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर केला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी या कामाचे भूमिपूजन आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 कुसरवे -वराड  येथील प. पू. श्री राणे महाराज मठ हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक भक्तांगण याठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. भाविक भक्तांच्या सोयीसाठी आ.वैभव नाईक यांनी याठिकाणी भक्त निवास आणि हॉलसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. सुसज्ज असे भक्तनिवास व हॉल याठिकाणी उभारला जाणार आहे. त्याबद्दल ट्रस्ट व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

 यावेळी मुरलीधर गोवेकर, नित्यानंद म्हाडगुत ,कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा महाभोज, आबा कोटकर, प्रकाश चोणकर, अवि नेरकर, गणेश वाईरकर, राजू सावंत, दाजी हडकर, संजय चव्हाण, आशिष परब, आप्पा परुळेकर , पेंडूर विभाग प्रमुख शिवा भोजने, वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत,  बाबू टेंबुलकर, निलेश हडकर , हर्षल मोरजकर, दिलीप आचरेकर, सतीश चव्हाण, दुर्गानंद गावठे, सत्यवान चव्हाण, अरुण गावडे, रुपेश आमडोसकर, महेश परब, किरण रावले, अनंत चव्हाण, शिशुपाल राणे, संजना चव्हाण, शुभदा चव्हाण, योगिता वेंगुर्लेकर  स्वप्नील आपटे आदी उपस्थित होते.