
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कासे गोताडवाडी मार्गे पुऱ्ये, शिरबे भागातील ग्रामस्थ तसेच नायशी हायस्कूलमध्ये ये-जा करणारे विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्थेमुळे त्रस्त होते. रस्त्याला भलेमोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांकडून अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नव्हती. संबधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही याकडे लक्ष देत नव्हते. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती.
या गंभीर समस्येची दखल घेऊन कडवई विभागातील शिवसैनिक सुभाष चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा जाधव यांच्याशी संपर्क साधला. जाधव यांनी तत्काळ ही समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याकडे मांडली आणि त्यांनी या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याची विनंती केली.
प्रशांत यादव यांनी त्वरित ही समस्या सोडवण्यासाठी होकार देऊन लगेचच या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची रस्त्याची खड्ड्याची समस्या अखेर दूर झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिरंबे, पुऱ्ये, आणि आसपासच्या गावांमधून जाणारी एसटी बस, जी मागील जून महिन्यापासून बंद होती, ती पुन्हा पूर्ववत सुरू होईल, यामुळे ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
ग्रामस्थ व विद्यार्थी तसेच पालकवर्गाने या समस्येच्या निराकरणासाठी तातडीने पाऊल उचलल्याबद्दल प्रशांत यादव , चंद्रकांतदादा जाधव आणि या कामात मोलाचे सहकार्य केलेल्या संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रथमेश शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनीआभार मानले .
या यशस्वी कामामुळे परिसरा तील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, याचे सर्व श्रेय प्रशांत यादव यांच्याकडे जाते. सर्व ग्रामस्थांनी यापुढे प्रशांत यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.