
वैभववाडी : कोळपे येथील उबाठाचे शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्वांचे आ. राणे यांनी भाजपात स्वागत केले. कोळपे गावातील या मोठ्या प्रवेशाने गावातील उबाठाला मोठा धक्का बसला आहे. कोळपे गावातील मानेवाडीतील ग्रामस्थांनी आज भाजपात प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा.प. सदस्य विलास माने, भिकाजी नारकर, सतीश नारकर, विक्रम नारकर, किशोर माने, किरण माने, वैशाली नारकर, तुकाराम माने, शैलेश माने, उत्तम माने, दिपाली नारकर, रूपाली नारकर, यशोदा नारकर, अनंत नारकर, मारुती नारकर, इब्राहिम नाचरे, रजनीकांत माने, महादेव शेलार, शिवाजी माने, बंड्या कदम, अनंत माने, रुपेश माने, दिनेश माने, कला माने, विनंती माने, सुचित शिंदे, संगीता माने, सविता माने, शितल माने, मनाली शिंदे, शुभांगी शिंदे, विजया शिंदे, सुगंधा शिंदे, सत्यवती कदम, शुभांगी कदम, आनंद कदम, बाळकृष्ण पाटणकर, सत्यवान पाटणकर व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती भालचंद्र साठे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, किशोर दळवी, सत्यवान पवार, सुनील माने, किशोर माने, मंगेश फोंडके, जगनाथ शिंदे, मंगेश शिंदे, अनिल माने, संतोष नारकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.