40 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

शेखर निकम यांच्या हस्ते राजेवाडी धरणाचे उदघाटन
Edited by: मनोज पवार
Published on: October 08, 2024 10:54 AM
views 244  views

चिपळूण :  चिपळूण तालुक्यातील लघुपाटबंधारे योजना राजेवाडी, डेरवण योजनेच्या दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रु. 14 कोटी 99 लाखांची निधी मंजुरी मिळवण्यात आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्या ला यशस्वी आले. या कामाचे भुमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

         राजेवाडी धरणाच्या तड्यामुळे मागील चार वर्षांपासून सावर्डे, डेरवण आणि परिसरातील 40 गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा सहन करावा लागत होता. धरणातील पाण्याचा साठा अपुरा असल्याने पाण्याची टंचाई वाढत होती. ग्रामस्थांनी ही गंभीर बाब आमदार शेखर निकम यांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर आमदार निकम यांनी तत्काळ बैठका घेत समस्येचा आढावा घेतला व उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला.


आमदार शेखर निकम यांनी या योजनेसाठी रु. 14 कोटी 99 लाखांची मंजुरी मिळवून दिल्यामुळे या भागातील 40 गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले. या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.

      याप्रसंगी माजी सभापती पूजा निकम, माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, माजी पंचायत समित सदस्य प्रकाश कानसे, संजय निराधार योजना अध्यक्ष शौकत माखजनकर, रमेश राणे, निलेश कदम, बंधू महाडीक, विष्णूपंथ सावर्डेकर, सावर्डे सरपंच समीक्षा बागवे, कुडप सरपंच बाबा राजेशिर्के, डेरवण सरपंच अक्षता मुंडेकर, मांडकी सरपंच अनंत खांबे, शिलभद्र जाधव, नरेंद्र राजेशिर्के, माजी सरपंच संतोष चव्हाण, प्रशांत राजेशिर्के, निलेश यादव, देवेंद्र राजेशिर्के, बाळूशेठ मोहिरे, जमिर मुल्लाजी, संदेश चव्हाण, शेखर चव्हाण, तात्या गुरव, उदय बुदर, बाबू चव्हाण, संगिता चव्हाण, विभागातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.