
वैभववाडी : कुसूर गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संतोष साळुंखे यांची निवड झाली. ग्रामसभेत ही बिनविरोध निवड झाली.
कुसूर गावची ग्रामसभा शुक्रवारी येथील नवभारत हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेत नव्याने तंटामुक्ती समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी श्री.साळुंखे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर मावळते अध्यक्ष सिताराम पाटील यांनी अभिनंदन केले. विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, सोसायटीचे चेअरमन पुंडलिक पाटील, ग्रामसेवक घनश्याम नावळे, तलाठी गणपत शिंदे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर श्री.साळुंखे म्हणाले, गावाने दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. सर्वांच्या सहकार्याने काम करेन असा विश्वास व्यक्त केला.