ते आरोप बिनबुडाचे व आकसापोटी !

कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही, मी सक्षम : चराठे सरपंच प्रचिती कुबल
Edited by: विनायक गांवस
Published on: October 02, 2024 15:23 PM
views 272  views

सावंतवाडी : पोलिस ठाण्यात चराठे गावचे रहिवासी क्लेटस फर्नांडीस यांनी उपोषण छेडले असून चराठे सरपंचांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे व आकसापोटी केलेले आहेत. सरपंच म्हणून मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. मी गावातील प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे  असा प्रत्युत्तर चराठा सरपंच प्रचिती कुबल यांनी श्री. फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपांच खंडन करताना दिले आहे. यापुढे नाहक बदनामी करून टिका केली गेल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशाराही सरपंच सौ.कुबल यांनी दिला आहे‌. 


सौ. कुबल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, क्लेटस फर्नांडिस यांनी उपोषणाच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतकडे तक्रार अर्ज दिला होता. असे असताना सरपंच कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत किंवा दखल घेत नाही हे त्यांचे म्हणणे अज्ञान समजावे की बालीशपणाचे समजावे ? असा सवाल त्यांनी केला. यापूर्वी ग्रामपंचायतकडे संबंधित बांधकामाबाबत व सेक्युरीटी गार्ड दहशत बाबत कोणतीही तक्रार नाही असाही खुलासा त्यांनी केला. तसेच सरपंच म्हणून मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. मी गावातील प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. यापुढे नाहक आरोप केल्यास किंवा बदनामी केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेला असा इशारा सरपंच सौ. प्रचिती चंद्रकांत कुबल यांनी दिला आहे.