
सावंतवाडी : भाजपचे पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस यांनी अनधिकृत बांधकाम व सेक्युरिटी गार्डकडून दहशत होत असल्याबाबत भाजपच्याच युवा नेत्याच्या विरोधात पोलिस ठाण्यासमोर उपोषण छेडले आहे. या उपोषणाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा देत निषेध केला आहे.
भाजपचे युवा पदाधिकारी क्लेटस् फर्नाडिस चराठे ग्रामपंचायत येथील रहीवाशी असून भाजपच्याच युवा नेत्याबाबतचा त्यांनी त्यांनी चराठा सरपंच यांना तक्रार अर्ज दिला होता. चराठा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून संबंधित यांचे दबावाखाली सरपंच काम करीत असल्याचेही त्यांनी आरोप केला आहे. तर संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर बंधूकधारी सेक्यूरिटी गार्ड चराठा गावच्या रहदारीच्या रस्त्यावर उभा असल्याने रहीवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्या नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत भाजपचे युवा कार्यकर्ते असणारे क्लेटस फर्नांडिस यांनी पोलिस ठाण्यात उपोषण छेडले होते.
दरम्यान, जिल्हयात कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी या करीता प्रशासनाकडून जमावबंदी व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असतानाही आपण आपले मागण्या करीता आमरण उपोषण सारखा मार्ग स्वीकारणे उचित नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरून आपल्या विरूद्ध प्रचलित कायदान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल. अशी नोटीस पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपोषण कर्त्यांना दिली आहे.
पाच कोटींचा दावा
दरम्यान, संबंधि नेत्यांने वकीलांकरवी कायदेशीर नोटीस भाजप तालुका उपाध्यक्ष क्लेटस फर्नाडिस यांना मानहानी पोटी पाच कोटींची नोटीस बजावली आहे. ही भरपाई न मिळाल्यास आपल्या विरुद्ध दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशीही ताकीद या नोटीसद्वारे देण्यात आल्याची माहिती उपोषण कर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या भाजप पदाधिकाऱ्याच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा जाहीर केला. त्याचे विरोधात काही घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. याप्रसंगी तालुकाप्रमुख नारायण राणे, अनारोजीन लोबो, बाबु कुडतरकर, अँड. निता सावंत, गजानन नाटेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.