
सिंधुदुर्ग : "स्वच्छता ही सेवा"अंतर्गत गेले १५ दिवस सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा समारोप समारंभ कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ्ता मिशन विनायक ठाकूर, कसाल सरपंच राजन परब, संस्था सचिव यशवंत परब, कसाल तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मालणकर, मुख्यध्यापक मळगांवकर यांसह अधिकारी, ग्रा प सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.