ओटवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी सगुण गावकर यांची फेरनिवड

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:29 PM
views 18  views

सावंतवाडी : ओटवणे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सगुण जयराम गावकर यांची फेरनिवड करण्यात आली . वर्षभरापूर्वी त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती वर्षभराचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची निवड ग्रामसभेत करण्यात आली.

 मागच्या वर्षभरात काही मोजके वाद विवाद सोडले तर मोठे तंटे तक्रारी समितीपर्यंत आले नव्हते आणि जे वाद विवाद होते ते घटना स्थळी  जात आपल्या बुद्धी कौशल्यच्या जोरावर समितीच्या साहाय्याने मीटविले. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राम सभेत त्यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला व त्यांची एकमताने तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छाही देण्यात येत आहेत. 

निवड प्रसंगी ओटवणे ग्रामपंचायत येथे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, रवींद्र म्हापसेकर उमेश म्हापसेकर, एकनाथ कोटकर, नारायण भानसे, संतोष तावडे, शशीकांत गोसावी, प्रभाकर गावकर आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.