
मालवण : पूर्वाश्रमीच्या पत्नीला पेट्रोल ओतून जाळून मारल्या प्रकरणी संशयीत आरोपी सुशांत सहदेव गोवेकर, वय 40 रा. धुरीवाडा मालवण याला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महिला वर्गाने मोर्चाचे आयोजन केले आहे. काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे.