कोकण रेल्वेचा खोळंबा

रेल्वे गाड्या दोन अडीच तास उशीरा
Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 12:39 PM
views 111  views

चिपळूण : आज कोकण रेल्वेच्या मडगाव ते मुंबई  आणि मुंबई ते मडगाव  जाणार्‍या  नियमित गाड्या दोन तेअडीच तास उशीर धावताहेत. रत्नागिरी चिपळूण  खेड  आदी स्थानकांवर प्रवाशी.खोळंबले आहेत. रेल्वेकडून उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. 

 मुंबईला जाणारी मांडवी चिपळूण रेल्वे स्टेशनवर  गाडीची वेळ दुपारी ३.३० आहे. ही  गाडी  मडगाव रेल्वे स्टेशनवरून अगदी वेळेत म्हणजे सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी सुटली आहे.  गणपतीची एकही जादा गाडी आता नाही,  कुठे फार  पाऊस किंवा इतर काही वेगळे अडथळ्यांचे कारणही नाही, तरीही मुंबईहून मडगाव कडे जाणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस या गाड्या निदान अडीच तास लेट आहेत. तर मुंबई- मडगाव जाणारी मांडवी दीड तास लेट आहे.  मडगांवहून मुंबईकडे  जाणारी मांडवी एक्सप्रेस सायंकाळी ४ वाजता तीन तास उशिरा येणार असे दिसत आहे.  खरंच कोकण रेल्वेला प्रवाशांची फिकिर नसल्याची नाही का? असे प्रश्न प्रवाशी विचारत आहेत.  तीस वर्षे होऊन सुद्धा नियमीत चालणाऱ्या रेेल्वे गाड्या  देखील वेळेवर का चालविता येत नाहीत? ही जबाबदारी कोणाची आहे? असे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. 

'व्हेअर इज माय ट्रेन', या ॲपवर मुंबई  जाणारी मांडवी एक्स्प्रेस साडेसहा वाजता येईल असे दिसत आहे , मात्र सायंकाळी ४.१५ पर्यंत ती रत्नागिरी पण आली नाही. चिपळूण रेल्वे स्टेशनवर बोर्डावर ती साडेचार वाजता येईल असे दिसत आहे.  139 क्रमांकावर चौकशीला फोन केला तेव्हा पहिल्यांदा सांगितले गाडी 3:30 ला येईल पुन्हा दहा मिनिटांनी केला तेव्हा सांगितले 5 वाजता येईल, असा कोकण रेल्वेकडून सावळा गोंधळ सुरू असून , याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना भोगावे लागत आहे.