रानवीत संविधान मंदिराचे उदघाटन

Edited by: मनोज पवार
Published on: September 19, 2024 14:53 PM
views 161  views

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागरच्या वतीने जागतिक लोकशाही दिनानिमित्त संविधान मंदिराचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.

यावेळी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, वेलदूर सरपंच दिव्या वनकर, मार्गदर्शक मंदार हुलसार आदिसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.