
देवगड : श्री भगवती देवालय देवगड तालुक्यातील मुणगे येथे सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता श्री. ब्राम्हणदेव सांस्कृतिक दिंडी मंडळ आचरा-पारवाडी यांचे दिंडी भजन. २२ सप्टेंबर रोजी रात्रौ १० वाजता पारंपारीक डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा विनोद चव्हाण विरुद्ध बुवा अजित मुळम यांच्यात होणार आहे.
२३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्री प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री भगवती दशावतार नाट्य मंडळ मुणगे डोंबिवली यांचा दशावतार नाट्य प्रयोग, सायंकाळी ७ ते ८ वाजता श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी महाआरती. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्रौ ठीक ९ वाजता श्री देवी भगवती देवस्थान मुणगे आयोजित भजन स्पर्धा. २७ सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता मुणगे समुद्र किनारी विसर्जन होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.