सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे नाव प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा

बबन साळगावकर यांचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2024 09:23 AM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात किती  वर्षे रुग्णांची हेळसांड चालणार असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. तर उपजिल्हा रुग्णालयाचे नाव‌ बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा असा खोचक टोला त्यांनी लगावला. 


ते म्हणाले, सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये एका महिला रुग्णास सर्पदंश झाला. तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आली. रुग्णालयामध्ये दुसऱ्या दिवशी या महिलेस जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. सावंतवाडी रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील गरीब अनेक पेशंट येत असतात, त्यांच्यावरती साधा उपचारही होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणी  आहे. इथली अस्वच्छता, इथे चांगले डॉक्टर्स नाहीत, अपुऱ्या स्टाफ वरती असलेल्या डॉक्टरांना काम करावे लागत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांवर बाहेरूनच जवळजवळ शंभर टक्के औषध आणावी लागतात. ज्या रुग्णालयात उपचार मिळू शकत नाही अशी रुग्णालय हवीत तरी कशाला ? रुग्णांना उपचार मिळू न शकत असलेल्या या हॉस्पिटलचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र करा असा टोला त्यांनी हाणला. निदान सावंतवाडी शहराचे नाव वर्ल्ड ग्रीनीज बुकमध्ये नोंद होईल असा खोचक टोला हाणत थोडी तरी लाज शरम असेल तर याची दखल घ्या अस मत व्यक्त केले आहे.