
बांदा : धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सर्वसाधारण सभा काल दिनांक 9/09/2024 रोजी बांदा येथे संस्थेचे अध्यक्ष नवलजी गावडे यांच्या अध्यक्षते खाली व मुंबई कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, सावंतवाडी व दोडामार्ग स्थानिक पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी, आजीव सभासद व समाजबांधव यांच्या उपस्थितीत मोठया आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी,आजीव सभासद व समाजबांधव उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला तसेच अनेक दानशूर समाज बांधवानी सामाजिक बांधिलकी जपत सढळ हस्ते बहुमूल्य असे आर्थिक सहकार्य केले. मंडळाच्या सर्व साधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व अनेक ठराव मंजुर करण्यात आलेे. या वेळी मंडळाचे सचिव देवेंद्र गावंडे यांनी मंडळाच्या वर्षभरातील कार्यवाही अहवाल वाचन केला. मंडळाच्या सामाजिक व विधायक अशा विविध उपक्रमांमध्ये वेळोवेळी उत्स्फूर्त सहभाग देणाऱ्या तसेंच मार्गदर्शन करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात समाज बांधवांचे मंडळाच्या संचालक मंडळाच्या वतीने मन:पूर्वक आभार आणि भावी काळात सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो. समाजाप्रती असलेली जाणीव आणि ओढ उत्तरोत्तर वाढत जाऊन असेच सहकार्य लाभो. समाजाच्या संघटन व विकासात्मक ध्येय साध्यतेसाठी मोलाचे योगदान लाभो असे आवाहन अध्यक्ष .नवल गावडे यांनी केले
मंडळाचे कार्यकारणी सदस्य रामचंद्र वरक यांनी समाजाची दिशा व दशा या विषयावर आपले मत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानु पाटील यांनी केले तर सचिव देवेंद्र गावडे यांनी मंडळाचे सर्व कार्यकारणी सदस्य, सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक यांचे आभार मानले.