
मंडणगड : मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्या वतीने, कुणबी भवनचा राजा गणेशोत्सव निमित्ताने 9 सप्टेंबर 2024 रोजी 45 वर्ष वयोगटावरील कलाकारांच्या गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धेचे कुणबी भवन येथे मंडणगड येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संभुराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळ व ओम शिव शंभू उन्नती कला मंडळ रायगड रत्नागिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेत पाच नाच मंडळांनी सहभाग घेतला.
दुर्मिळ झालेली लोककला जतन करणाऱ्या नाच मंडळांनी पांरपारीक पध्दतीने केवळ ढोलकी व चाळांच्या तालावर आपली कला सादर करून आपली कला सादर केली. पांरपारीक आध्यात्मिक व आधुनीक पध्दतीचे गण गौळण व अंभग असा तीस मिनीटांचा कार्यक्रम व किमान तीन चाली सादर करताना तालुक्यातून मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी गोळा झालेल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सततधार पाऊस सुरु असतानाही सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी गर्दी कमी केली नाही त्यामुळे मनोरंजानाच्या पलीकडे जात प्रबोधान व मांडणी कशी करावी हे सांगण्यास हा कार्यक्रम यशस्वी ठरला. बदलत्या काळातील सर्व चुरीच्या प्रथांना फाटा देत शाहीर मंडळीनी अतिशय सकस व टिकाकारांनी तोंडी बंद करणारे केलेले सादरीकरण हे स्पर्धा कार्यक्रमाचे महत्वाचे वैशिष्ठ्य ठरले. स्पर्धेत प्रथम क्रमांक पेण तर्फे तळे, द्वितीय शेनाळे बोलाडेवाडी, तृतीय तुळशी, चतुर्थ करंजमाळ मुमुर्शी, पाचवा क्रमांक भवानी नडगाव नाच मंडळांनी पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह, ढाल देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेकरिता काव्य विभाग रामचंद्र म्हात्रे, प्रशांत नाकती, चाल विभाग अरुण नाकती, संजय सुगदरे, गायन व वाद्य अजित लाड, विजय जोशी, मनोहर पारदुले, रंगबाजी व सादरीकरण शशिकांत लाड, तुकाराम रेणोसे यांनी परिक्षक म्हणून तर परीक्षक प्रमुख म्हणून रमेश घडवले, विद्यानंद अधिकारी, सुनील साळवी यांनी काम पाहीले.
कार्यक्रमास कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, सचिव अंकुश जाधव,निवृत्त पोलीस अधिकारी रमेश घडवले माजी सभापती भाई पोस्टुरे अँड. समिधा सापटे, सौ. डेरे, वैशाली माळी, मुरलिधर बैकर, विश्वजीत लोखंडे, संतोष पार्टे, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा संघाचे रघुनाथ पोस्टुरे, सचिन माळी, विजय ऐनेकर यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपुर्ण कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन समिर येलवे यांनी केले.