
देवगड : देवगडात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात " स्वच्छ माझे अंगण " हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे.
स्वच्छतेची सवय अंगिकृत करण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याचा निर्णय या मोहिमेच्या माध्यमातुन शासनाच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला आहे . या पार्श्वभूमीवर शोष खड्डा / परसबाग / पाझर खड्डा , घनकचरा व्यवस्थापन करिता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडया अशा बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी हा त्याचा उद्देश आहे . या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांना श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे . त्यामुळे जास्तीस जास्त कुटूंबांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी केले आहे .
अभियान अंमलबजावणी कालावधी टप्पे
अभियान कालावधी १/९/ २o२४ ते २५/९/ २o२४
पडताळणी कालावधी २६/९/ २o२४ ते
३०/९/ २o२४
पात्र कटूंबांना लेखी स्वरूपात निमंत्रण देणे -०१/१०/ २o२४
प्रशस्तीपत्र वितरण २/१०/ २o२४