सिंधुदुर्गनगरी : ७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आधीपासूनच चाकरमानी व गणेशभक्त येऊ लागल्याने येणाऱ्या चाकरमान्यामधून तापाची व इतर आजाराची लक्षणे दिसणाऱ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानकावर १८ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोग्य तपासणी करून जोखीमीच्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.