भजन साहित्यांचे वाटप

Edited by: लवू परब
Published on: September 05, 2024 12:51 PM
views 106  views

दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य वाटप केले. यावेळी भजनी मंडळांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.

      दोडामार्ग येथील सुशीला हॉल मध्ये गुरुवारी सकाळी भजनी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा मतदार क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, दादा देसाई, गुरूदास सावंत, शहरप्रमुख योगेश महाले, तिलकांचन गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

       मंत्री दीपक केसरकर हे दरवर्षी दोडामार्ग तालुक्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्यांचे वाटप करतात. यंदाही त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास २०० भजनी मंडळांना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातून भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मंडळांनी मंत्री दीपक केसरकर व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.



मंत्री दीपक केसरकर हे नेहमी कलेला वाव देतात व त्याला लागणाऱ्या मदतीसाठी त्यांचा पुढाकार असतो. निवडणुका आल्या की लोकसंपर्कात रहायचे असा त्यांचा स्वभाव नाही. शिवाय मदत करायची आणि त्याची जाहिरातबाजी करायची हे ते मुद्दामहून टाळतात. ज्याप्रमाणे घारीचे लक्ष आपल्या पिल्लांवर असते त्याचप्रमाणे मंत्री दिपक केसरकरांचे लक्ष त्यांच्या मतदारसंघासहीत राज्यातील जनतेवर आहे. त्यामुळे अशा आमदाराला पुन्हा विधानसभेवर पाठवा व तुम्ही नक्कीच पाठवाल यात अजिबात‌ शंका नाही असे मत राजन पोकळे यांनी व्यक्त केले.