
दोडामार्ग : कोनाळ येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निमंत्रीत खुली भजन स्पर्धेत श्री स्वराभिषेक भजन मंडळ, मणेरी प्रथम, व श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ ईन्सुली द्वितीय तर तृतीय श्री स्वरधारा भजन मंडळ तांबोळी यांनी क्रमांक मिळविले. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शैलेश दळवी यांच्या हस्ते विजेत्या संघाना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, गुलाबपुष्प आणि रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.
श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळ, कोनाळ यांच्या वतीने आयोजन शनिवार दिनांक शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट व रविवार १ सप्टेंबर २०२४ दोन दिवशीय सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निमंत्रीत खुली भजन स्पर्धा श्री कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर, कोनाळ याठीकाणी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शैलेश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर कोनाळ एम. आर. नाईक माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संतोष घोगळे, दशावतारी कलाकार तथा पत्रकार शंकर जाधव, हनुमंत गवस, परीक्षक प्रसाद गोसावी, उदय गवस, श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळ कोनाळ अध्यक्ष सुभाष लोंढे, ग्रामस्थ निवास लोंढे, माजी सैनिक जयवंत लोंढे, माजी पोलीस हवालदार दीपक लोंढे तसेच इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निमंत्रीत खुली भजन स्पर्धेत श्री स्वराभिषेक भजन मंडळ, मणेरी प्रथम, श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ ईन्सुली द्वितीय, तृतीय श्री स्वरधारा भजन मंडळ तांबोळी तर उत्तेजनार्थ श्री देव विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ-बोडदे यांनी क्रमांक मिळविले.उत्कृष्ट हार्मोनियमसाठी समिर नाईक (श्री स्वराभिषेक भजन मंडळ, मणेरी), उत्कृष्ट पखवाजसाठी राम गवस (श्री देवी राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ, नेतार्डे), उत्कृष्ट गायक साहिल देसाई श्री देवी माऊली प्रा. भजन मंडळ, कोलझर,उत्कृष्ट तबला राकेश डेगवेकर डेगवे, उत्कृष्ट कोरस श्री सातेरी राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ दोडामार्ग, उत्कृष्ट झांज मयूर पारकर श्री देवी माऊली प्रा. भजन मंडळ ईन्सुली,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शैलेश दळवी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघ आणि स्पर्धाकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, गुलाबपुष्प आणि रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.
कलाकार यांचा मंडळाच्या वतीने सत्कार
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निमंत्रीत खुली भजन स्पर्धेचे औचित्य साधून स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी केर गावचे तबला वादक गंगाराम देसाई, हार्मोनियम वादक तात्या खानोलकर, घोटगेवाडी येथील तबला वादक काशीनाथ सुतार, हार्मोनियम वादक बाळू बागेलकर, कोनाळ येथील तबला वादक लाडू गुंडू लोंढे, हार्मोनियम वादक रामाराव लोंढे, माजी सैनिक समीर लोंढे तसेच पत्रकार तथा दशावतार उत्कृष्ट झांज वादक शंकर मधुकर जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला.