
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खाते हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधकाम विभागाबाबत घेतलेली भूमिका ही योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत असं मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. जिल्ह्यातील एकही रस्ता शिल्लक राहिलेलं नाही. हजारो कोटी रुपये रस्त्यामध्ये घालून याकडे मंत्री लक्ष देत नाहीत. गेल्या वर्षीपासून आंबोली रस्त्याच्या संदर्भात अनेक निवेदना या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी यात लक्ष घालणं आवश्यक होतं. मात्र ते दुर्लक्ष का करतात हे पडलेलं कोड आहे. ते जात असलेला रस्ता म्हणजे आंबोली घाट रस्ता यंदाही वाहून गेला. परंतु कारवाई काही होत नाही. याची कारण काय ? याचे उत्तरे रवींद्र चव्हाण यांनी द्यावीत. आंबोली घाटात अनेक अपघात झालेत वाहनांची वाहनांची नासधूस झालेली आहे. अपघातामध्ये अनेक जीव गेले आहेत. परंतु इथल्या मंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही ही शोकांतिका आहे. परशुराम उपरकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात बाबत घेतली भूमिका समर्थनिया आहे असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.