
सावंतवाडी : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड करण्यात आली. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन व सत्कर करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सदस्य, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.