कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी ? : आबा सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2024 13:21 PM
views 269  views

सावंतवाडी : सध्या राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 3 तारीखपासून संपाची हाक दिली आहे.मात्र राज्य शासन अजूनही केवळ तारीख पे तारीखच करत आहे. महामंडळ तोट्यात असल्याची कायम वल्गना करणारे महामंडळातील अधिकारी कंत्राट जाहीर करताना मात्र तोट्याचा विचार करताना दिसून येत नाहीत असं मत एस.टी. कामगार सेना तालुकाप्रमुख आबा सावंत यांनी व्यक्त केले. 

सध्या मोठा गाजावाजा करत सगळीकडे इलेक्ट्रिक बस गाड्यांची राज्य परिवहनच्या ताफ्यात रवानगी करण्यात आली. आता या गाड्यांना चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता ही ओघओघाने आलीच. अश्यावेळी महामंडळाच्या वतीने सर्व आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याच काम सुरू करण्यात आलं आहे.पण यामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशीच परिस्थिती झाली आहे.सावंतवाडी आगारातील खालील(वेंगुर्ला) स्टँडच्या आवारात हे चार्जिंग स्टेशनसाठी कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. तसेच चिरे वगैरे आणून खोदलेल्या खड्याचा राडारोडा हा तिथेच टाकला आहे.यामुळे स्टँड वर कर्मचाऱ्यांना गाडी वळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.तसेच गाडीत चढ उतार करणाऱ्या प्रवाशांनाही याचा त्रास होत आहे.याची नाराजी कर्मचारी आणि प्रवाशी यांनी एस.टी. कामगार सेना तालुकाप्रमुख आबा सावंत यांच्याकडे केल्यावर त्यांनी जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यानुसार आज सावंतवाडी स्थानकात जाऊन एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक,तालुकाप्रमुख आबा सावंत,शब्बीर मणियार यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणी दरम्यान कर्मचारी यांनी केलेल्या तक्रारीला स्थानिक रिक्षा चालकांनीही दुजोरा दिला. या स्टँड च्या दुरावस्थेमुळे आणि कंत्राटदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे स्टँडवर अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. याअगोदर ही एक दोन वेळा किरकोळ अपघात घडलेले असल्याच ही सांगितलं.यावेळी कंत्राट नक्की ठेकेदारांसाठी आहेत का असा सवाल एस.टी. कामगार सेना तालुकाप्रमुख आबा सावंत यांनी उपस्थित केला. तसेच गणपती अगोदर जर  टाकलेले चिरे एका बाजूला करून जागा साफ न केल्यास कंत्रातदारास आणि संबंधित अधिकाऱ्यास योग्य तो शिवसेना स्टाईल धडा शिकवू असा इशारा जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी दिला आहे.