सुकन्या वारंगची राज्य कर निरीक्षकपदी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: August 18, 2024 13:55 PM
views 112  views

सावंतवाडी : सुकन्या वारंग हिने एम.पी.एस.सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.एकाच वर्षात तीने तब्बल पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. तीची खुला महिला प्रवर्गातून निवड झाली आहे.