बांदा केंद्र शाळेने पाठवल्या जवानांना राख्या

Edited by:
Published on: August 18, 2024 12:27 PM
views 109  views

बांदा : एक राखी जवानांसाठी सीमेवरच्या भावांसाठी या उपक्रमांतर्गत  पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं‌१ केंद्र शाळेतील स्काऊट गाईड या पथकातील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या बनवून पोस्टामार्फत २५१ राख्या जवानांना पाठविण्यात आल्या.   

बहिण भाऊ यांचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊन, वारा ,पाऊस याची तमा न बाळगता भारतीय जवान हे अहोरात्र पहारा देत असतात.  रक्षाबंधन सणाच्या दिवशी देशसेवेसाठी तैनात असलेल्या जवानांना   घरी येऊ राखी  बांधून घ्यायला येणे शक्य नसते.सैन्यातील या भावांचा उत्साह वाढावा व बहिणीच्या मायेचा मिळावा यासाठी बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या राख्या पाठवून सैनिकां विषयी कृतज्ञता व्यक्त केली ‌.      

  प्रशालेच्या वतीने दरवर्षी ‌सीमेवरच्या जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर , स्काऊटर शिक्षक जे.डी पाटील, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रसिका मालवणकर, स्नेहा घाडी,शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, फ्रान्सिस फर्नांडिस, कृपा कांबळे, मनिषा काळे ,मृणाल परब यांचे  मार्गदर्शन लाभले.या उपक्रमाला बांदा ‌पोस्ट कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.