जिल्हा युवती पुरस्काराने श्रद्धा पाटकर सन्मानित !

Edited by: ब्युरो
Published on: August 17, 2024 14:48 PM
views 130  views

सिंधुदुर्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवती पुरस्कार सन २०२०-२१ चा पुरस्कार अनुभव साथी श्रद्धा पाटकर हिला प्रदान झाला. हा पुरस्कार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. 

श्रद्धा पाटकर हिने शाळाबाहेरची शाळा हा अत्यंत स्तुप्त उपक्रम राबविला होता. कोरोना काळ सुरु झाल्यापासून तिने मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून विविध उपक्रम राबविले. अनुभव शिक्षा केंद्रासोबत साथी म्हणून तिने दोन वर्ष काम पहिले. या कालावधीमध्ये तिने चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदत करण्यात मोलाचा वाटा होता. सोबतच तरुणांच्या कौशल्यांमध्ये वृद्धी होण्यासाठी एक दिवशीय शिबिरे, स्पर्धा, अभ्यास दौरा तसेच त्यांच्या प्रश्नांना घेऊन ठोस भूमिका राबविली. रोटरॅक्ट, सिंधू रक्तामित्र अश्या संस्था मध्ये मोलाची भूमिका बजावली. तिच्या या कामगिरी बद्दल आणि पुरस्काराबद्दल महाराष्ट्र स्तरावर गौरव उदगार काढले जात आहेत.