
देवगड : देवगड येथील मिठमुंबरी ध्वजारोहण करण्याचा मान येथील सरपंच यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग व कराटे चॅम्पियन्स कु.वीर प्रविण मुंबरकर यांना देण्यात आला. त्यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य,ग्रामसेवक, ग्रा. पं. कर्मचारी, विविध मंडळाचे सदस्य, महिला बचतगट, शिक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७८वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत यांच्या वतीने त्याला शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. मिठमुंबरी गावाचे व देवगड तालुक्याचे नाव विर मुंबरकर याने उज्वल केले आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त,मिनी मॅरेथॉन स्पर्धा यावेळी घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये शाळेतील मुले, महिला व पुरुष वर्ग यांनी मोठ्या प्रमानात सहभाग घेतला होता. तसेच शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत यांचे गाण्याचे कार्यक्रम देखील पार पडले.