
वैभववाडी : मांगवली येथील प्रकाश काळे यांचं उपोषण स्थगित // पालकमंत्री यांनी दुरध्वनीवरून काळे यांच्याशी साधला संपर्क // भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केली मध्यस्थी // अरुणा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम करीत असताना जमिनीत केलेले अतिक्रमण व सुरुंग स्फोटात घर, पाण्याची विहीर यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मांगवली येथील प्रकाश काळे यांनी केले होते उपोषण // गेली सहा महिने या विषयासाठी प्रशासनाकडे मागत होते दाद //मात्र जलसंपदा विभागाने त्यांच्या मागणीकडे केला होता दुर्लक्ष //अखेर आज श्री काळे यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केले होते उपोषण // या उपोषणाला सर्वपक्षीय नेतेमंडळींनी दिला पाठींबा//भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी दुपारी थेट यासंदर्भात पालकमंत्री रविंद्र चव्हाण व श्री काळे यांच्यात फोनद्वारे घडवला संवाद // पालकमंत्र्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालण्याचे दिलं आश्वासन //जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दिल्या सुचना // पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री.मगरे यांनी नुकसान भरपाई देण्याचे दिलं लेखी आश्वासन // त्या आश्वासनानंतर श्री काळे यांनी उपोषण सोडले //