
सावंतवाडी : बैठकीत उपस्थित नव्हते त्यांनी प्रथम माहीती घ्यावी. उगाच चौकुळच्या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सोमनाथ गावडे यांनी करू नये. गावात आपापसात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, गावची एकता राखावी. मुख्यमंत्री बैठकीवर चौकुळ गावाचा बहिष्कार यात काहीही तथ्य नाही असा पलटवार चौकुळचे ग्रामस्थ अभिजीत मेस्त्री यांनी केला आहे.
ते म्हणाले, चौकुळ गावच वैशिष्ट्य म्हणजे दर मंगळवारी गाव एकत्र जमते व बैठक होते. जमिनी संदर्भात हे गाव १५ ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे हे समजल्यावर मंत्री दीपक केसरकर गावच्या मंडळींना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत आदिंसह उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भेट द्यावी अशी मागणी केली होती. यानुसार १४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांशी बैठक ठरली. काल मंगळवारी उपोषणाची रूपरेषा ठरविण्यासाठी बैठक झाली. यात जोपर्यंत जमिनी मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याच ठरलं. तसेच मुख्यमंत्री यांच्या बैठकीत जायचं याची सर्वानुमते यादी ठरविण्यात आली. ही टीम मुख्यमंत्री भेटीसाठी रवाना देखील झाली. जे आजच्या बैठकीत उपस्थित नव्हते त्यांनी प्रथम ही माहीती घ्यावी. उगाच या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सोमनाथ गावडे यांनी करू नये. गावात आपापसात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, गावची एकता राखावी. मुख्यमंत्री बैठकीवर चौकुळ गावाचा बहिष्कार यात काहीही तथ्य नाही असा पलटवार चौकुळचे ग्रामस्थ अभिजीत मेस्त्री यांनी केला आहे.