भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्षपदी सुरेश कामत !

Edited by: समीर सावंत
Published on: August 10, 2024 10:49 AM
views 225  views

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पाच वर्षाच्या कालावधीकरिता कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश उर्फ परशुराम दिनकर कामत यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. श्री. कामत हे गेली 20 वर्षे संस्थानच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळत आहेत. 

कार्यकारी मंडळाच्या खजिनदारपदी गोविंद यशवंत नार्वेकर, सेके्रटरीपदी निवृत्ती सुरेश धडाम यांची तर सभासद म्हणून मुरलीधर विष्णू नाईक, सखाराम मारुती अंधारी, गजानन भालचंद्र उपरकर, नागेश रमेश मुसळे, काशीनाथ रामचंद्र कसालकर, शिरीष चंद्रशेखर वीरकर (मुंबई), सुधीर महादेव सावंत (मुंबई), सोमनाथ पांडुरंग खेडेकर (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सल्लागार मंंडळावर गौतम एकनाथ ठाकूर (मुंबई), राजाराम दत्तात्रय बारस्कर (ठाणे), अनंत बाळकृष्ण सौदागर (ठाणे), सुहास जगन्नाथ पालव (सी.ए., कणकवली), शिवानंद श्रीधर रेवंडकर (काळसे), माधव रामचंद्र कदम (कणकवली), उमेश सहदेव वाळके (कणकवली), अशोक आत्माराम बागवे (मुंबई), भरत विठ्ठल उबाळे (कणकवली), कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. राजेंद्र विश्राम रावराणे (कणकवली), वैद्यकीय सल्लागार डॉ. सुर्यकांत नारायण तायशेटये (कणकवली), शैक्षणिक सल्लागार शरद कृष्णा हिंदळेकर (कणकवली), सांस्कृतिक सल्लागार मनोज भालचंद्र मेस्त्री (कणकवली) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थान व्यवस्थापकपदी पुन्हा विजय दिगंबर केळुसकर यांचीच कार्यकारी मंडळाने निवड केली.