
सिंधुदुर्गनगरी : ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोलंबली आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. तसेच याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करावी. या मागणीसाठी सावंतवाडी निरवडे येथील सौ श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु केले होते मात्र यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर आता थेट मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचे श्रीमती गावडे यांनी निश्चित केले आहे. 15 ऑगस्ट पासून या आंदोलन त्या सुरू करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. ग्रामपंचायत यांसह खाते प्रमुख बायोमेट्रिक प्रणाली लागू असताना त्याची अंमलबजावणी करीत नाहीत त्याला कुठच्या आधारावर वेतन दिले जाते ? असा सवाल करत शासन निर्णयाचा अवमान करून फसवणूक करीत वेतन घेणारे या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन कारवाई करून गुन्हे दाखल करावेत .यासाठी आपण दोन जून पासून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयासमोर शासनाच्या निषेधार्थ काळ्याफिती लावून आंदोलन केले. तसेच दोन जुलै ते सात जुलै पर्यंत पुन्हा आंदोलन सुरू केले. मात्र याकडे जिल्हा प्रशासन किंवा कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता आपला नाईलाज झाला असून, आपण 15 ऑगस्ट पासून मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे. असा इशारा श्रीमती गावडे यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना दिला आहे. त्यामुळे त्या आता आपले आंदोलन मुंबई मंत्रालय येथे 15 ऑगस्ट पासून सुरू करणार आहेत.जो पर्यंत या मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असे त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.