
सावंतवाडी : बाहेरचावाडा येथील मदिना मज्जिदच्या समोर जुना मुंबई- गोवा हायवेच्या बाजूला मोठ खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये पडून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याबाबतची माहिती तेथील सामाजिक कार्यकर्त्या तथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा सचिव समीरा खलील यांना मिळताच त्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही सुरू केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी लक्ष वेधले व तेथील ग्रामस्थांना सोबत घेऊन बांधकाम विभागाला निवेदन दिले. या विषयाबाबत तात्काळ उपायोजना व्हावी यासाठी समीरा खलील बांधकाम विभागामध्येच ठाण मांडून बसल्या होत्या. यावेळी निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे या ठिकाणी जाऊन हायवेवर पडलेला खड्डा तत्काळ बुजवण्यात आला. त्यामुळे पुढे होणारी दुर्घटना टाळली.प्रत्येकाच्या संकटाला धावून जाणारी समीरा खलील नेहमीच अशा घटनांबाबत सतर्क व ऍक्टिव्ह असते. समीरा खलील यांच्या सेवाभावी कार्याबाबत उपस्थितांकडून कौतुक करत आभार मानण्यात येत आहेत.