
सावंतवाडी : सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दीन हॉल येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या कोकण विभागीय शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दृष्टिहीन बांधवांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सदैव सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या कोकण विभागीय शाखेचा तिसरा वर्धापन दिन सावंतवाडीत साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोंसले आदींनी मनोगत व्यक्त केली. दृष्टिहीन बांधवांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सदैव सोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, भागिरथचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, बाळा बोर्डेकर, बाबुराव गावडे, शेखर आळवे, नंदा सावंत, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर आदींसह नागरीक उपस्थित होते.