माजी सरपंच सुभाष कांबळे यांना पितृशोक !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 19, 2024 13:49 PM
views 142  views

वैभववाडी : वेंगसर बौध्दवाडी येथील सखाराम सोनू कांबळे वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे कार्याध्यक्ष, माजी सरपंच सुभाष कांबळे व पोलीस पाटील सुनील कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.