
दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत वडापाव विक्री व्यावसाय करणारा युवक संतोष गावडे याच्या गाड्यावर भले मोठे झाड पडून नुकसान झाले. याबाबत शिवसेनेच्या तालुका पदाधिऱ्याना माहिती मिळताच सदर युवकाला पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी उमेद मिळावी यासाठी तातडीची रोख मदत दिली.
याबाबतची माहिती अशी की, संतोष गावडे हा युवक केर निडलीवाडी येथील आहे. धनगर समाजाचा हा युवक मोठया जिद्दीने दोडामार्ग येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय करतो. अलीकडेच त्याने पावसाळी छप्पर करून नूतनीकरण केले आहे. गाड्याच्या बाजूला असणारे फणसाचे झाड गुरुवारी सायंकाळच्या वादळी पावसात दुकानावर कोसळले. संतोष हा त्या ठिकाणी वडापाव बनविण्याचे काम करत होता दैव बलवत्तर म्हणून तो बचावला अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
दरम्यान याबाबतची माहिती शिवसेना तालुका पदाधिकारी यांना मिळाली त्यानंतर ही बाब त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कानी घातली त्यानंतर त्यांनी सदर व्यावसायिकास तातडीची मदत म्हणून रोख दहा हजार रुपये दिले. ही मदत शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेना पदाधिकारी रामदास मेस्त्री, संजय गवस, संदीप गवस, अभिजित गवस, कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत यांनी श्री. गावडे यांच्याकडे सुपूर्द केली.