
वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा कापना गल्ली येथील दीपक नाटेकर व सुशील नाटेकर यांच्या घराची भिंत पावसामुळे पडून त्यांचे नुकसान झाले. याची तात्काळ दखल घेत दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने त्यांना तातडीची आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील मोरजकर, कोस्टल भागाचे तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, उपतालुका प्रमुख कौशिक परब, शाखा प्रमुख संदीप मसुरकर, मनू साळगावकर, हर्षा परब आदी उपस्थित होते.