
देवगड : देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक पदी निरंजन दिक्षित यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेमध्ये गेली 20 वर्षे निरंजन दिक्षित हे सल्लागार पदी कार्यरत होते. सल्लागार म्हणून त्यांनी संस्थेच्या हिताचे सल्ले देवून सर्वांगीक विकासासाठी राबविण्यात येणा-या उपक्रमांमध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते. तसेच दिक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून निरंजन दिक्षित हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून वाडा हायस्कुल, पडेल हायस्कुल, देवगड व जामसंडे या चार माध्यमिक हायस्कुलांना क्रिडांगणासाठी शाळेच्या सुशोभिकरणासाठी व विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन मोठे योगदान देत आहेत. तसेच माध्यमिक शाळांनाही मदत करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपुर्वी दिक्षित फाउंडेशन हि संस्था स्थापन करुन या संस्थेच्या माध्यमातून निरंजन दिक्षित हे शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये समाजकार्य करीत आहेत. त्यांनी अनेक गोरगरीब विदयार्थ्यांना आर्थिक् व शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे व ते करीत आहेत.
अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम दिक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून दिक्षित करीत आहेत. याच त्यांच्या अविरत कार्यामुळे त्यांची देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे.