
सावंतवाडी : अंगावर भिंत कोसळल्यानं पिता-पुत्र जखमी झाले आहेत. शहरालगतच्या चराठे गावात ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे ही मातीची भिंत कोसळली आहे. यात पिता पुत्र दोघेही जखमी झालेत.
गणपत बिर्जे, यशवंत बिर्जे अशी जखमींची नावं असून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.