
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडीत कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली. श्री श्री 108 महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून तब्बल 6 हजार 501 दिव्यांनी माड्याची वाडी उजळून निघाली. ही दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडीत कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. श्री श्री 108 महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून कोजागिरीनिमित्त या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत.

सकाळी गुरुमंत्र, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. तर संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल 6 हजार 501 दिव्यांनी माड्याची वाडी उजळून निघाली. दिव्यांची ही आरास डोळ्यांचं पारण फेडणारी ठरली.

यावेळी श्री श्री108 महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरू गावडेकाका महाराज, श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास मड्याचीवाडी संस्थेचे पदाधिकारी पंकज कामत, दत्तात्रय किनळेकर, राकेश केसरकर, स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास, बेतीम गोव्याचे पदाधिकारी अमित कोरगावकर, गिरीधर गावडे, अक्षय गाड, सुजय गावडे, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.
