कोचरे उत्कर्ष (डॉ. शिरोडकर) सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात

मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: संदीप चव्हाण
Published on: February 12, 2023 20:07 PM
views 307  views

म्हापण: कोचरे उत्कर्ष (डॉ. शिरोडकर) सहकारी पतसंस्था मर्यादित कोचरेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कोचरे उत्कर्ष( डॉ. शिरोडकर) सहकारी पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षीत पदार्पण केल्याने पतसंस्था अध्यक्ष संचालक यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी वेंगुर्ला मतदार संघाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. 


      या कार्यक्रमात मोफत आरोग्य शिबिर मान्यवरांचे सत्कार ,माजी संचालक यांचे सत्कार यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, पतसंस्था अध्यक्ष सुभाष चौधरी, व्हाईस चेअरमन नरे, सावंतवाडी डॉ.गुप्ता सावळाराम नेवाळकर, योगेश तेली कोचरे ग्रामपंचायत सरपंच, उदय फणसेकर कोचरे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष ,अवधूत रेगे सरपंच निवती मेढा, देवदत्त साळगावकर संचालक एस एल देसाई विद्यालय पाट, मनोहर तेली, संचालक माजी अध्यक्ष ,अतुल फणसेकर संस्थापक अध्यक्ष यांचे चिरंजीव कृष्णा फणसेकर ,महेश सामंत माजी सरपंच भोगवे ,आप्पा फणसेकर चेअरमन पतसंस्था, वंदना किनळेकर माजी जिल्हा परिषद सदस्य ,कोरे सर मुख्याध्यापक एस एल देसाई विद्यालय पाट, झिलू गोसावी, मनोहर तेली आदी मान्यवर उपस्थित होते.


      यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणाले की, हा मतदारसंघ माझा असून जरी मी मुंबईचा पालकमंत्री असलो तरी माझे येथे विशेष लक्ष असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे येथे करण्यात येत आहेत. मागील ५ वर्षात विद्यमान सरपंच योगेश तेली यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा निधी आपण कोचरे गावासाठी दिला. दरम्यान निवती श्रीरामवाडी झुलता फुल अद्याप उभारला गेला नाही तेही काम पूर्णत्वास नेले जाईल असे आश्वासनही यावेळी केसरकर यांनी दिले. तसेच पतसंस्थेबद्दल बोलताना पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांचे विशेष कौतुक केले त्याचप्रमाणे मीराताई जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील कार्यक्रमास रवाना झाले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुशांत नाईक यांनी देखील आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना या पतसंस्थेचा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना बोलून सत्कार केला जाईल अशी ही ग्वाही या निमित्ताने दिली. त्याचप्रमाणे इतरही मान्यवरांनी या रोप्य महोत्सवानिमित्त पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कोचरे प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शिबिरात मोफत मधुमेह तपासणी डोळे तपासून चष्मे वाटप करण्यात आले.