कोचरे दत्तमंदिराचा होणार कायापालट !

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून १ कोटींचा निधी
Edited by: दिपेश परब
Published on: February 01, 2024 06:22 AM
views 460  views

वेंगुर्ला : कोचरे दत्त मंदिर परिसर व कोचरे जेटी परिसर सुशोभीकरण करून अनुषंगिक कामे करणे यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामार्फत कोचरे दत्त मंदिर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात या संपूर्ण भागाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

     कोचरा दत्त मंदिर हे खाडी किनारी असलेले एक जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचा जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र म्हणून समावेश आहे. दरम्यान हे मंदिर पर्यटन दृष्ट्या कसे विकसित करता येईल यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे प्रयत्न सुरू होते. संपूर्ण दत्त मंदिर परिसर हा निसर्गाच्या दृष्टीने अतिशय संपन्न असा परिसर आहे. याठिकाणी जेटी सुद्धा आहे. या सर्व बाबींचा विचार करता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सुमारे १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच हे काम मंजूर होण्यासाठी नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचे मोठे योगदान लाभले आहे. यातून या दत्त मंदिर परिसरात चा पर्यटन दृष्ट्या विकास केला जाणार आहे. भविष्यात या ठिकाणी बोटिंग सुविधा, पर्यटकांसाठी इतर सुविधा निर्माण होऊन स्थानिकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे.

या कामाचे लवकरच दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामास सुरवात होणार आहे. कोचरे दत्तमंदिर परिसर विकासासासाठी हा निधी दिल्याबद्दल येथील गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट व कोचरे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.