आनंदी शिक्षणासाठी अँटीरॅगिंग आणि पोक्सो कायद्याची माहिती करून घ्या : अॅड. सोनू गवस

Edited by: संदीप देसाई
Published on: August 25, 2023 10:51 AM
views 185  views

दोडामार्ग : विद्यार्थ्यांना आपले आयुष्य सुखा समाधानाने आणि आनंदाने शिक्षण घ्यायचे असेल तर अँटीरॅगिगं  आणि पोकशो कायद्याची माहिती करून घ्या, आणि त्यापासून कायमच दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण चुकून जरी या कायद्याच्या कचाट्यात सापडलो तरी आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते असे प्रतिपादन ऍड. सोनू गवस यांनी केले.

येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात अँटीरॅंगिग  व पोकशो  या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. प्रशांत ढेपे, प्रा.डॉ.प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रा. डॉ. संजय खडपकर, प्रा. रामकिशन मोरे, दोडामार्ग न्यायालयाचे चौधरी  उपस्थित होते.

यावेळी सोनू गवस यांनी पोकशो या कायद्याची विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती दिली. तर अँटीरंगींग  या विषयाची माहिती देताना एड. मनोज सावंत म्हणाले की, आपल्या देशाचे संविधान आपल्यासाठी आदर्श आहे.त्यातील किमान काही घटकांचे आपण वाचन केले पाहिजे आणि अशा घटना घडनार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. प्रास्ताविक प्रा. गाथाडे यांनी सूत्रसंचालन डिंपल राजपुरोहित हिने केले. आभार कुमारी पुष्पलता गावडे हिने मानले. यावेळी अँटीरॅगिगं व पोस्को कायद्याच्या माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.