अरिहंत हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्रज्ञनाद्वारे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. विक्रांत मगदूम व सहकाऱ्यांची कामगिरी : भविष्यात हॉस्पिटल रोबोटिक शस्त्रक्रियेचे केंद्रबिंदू होणार
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 04, 2023 20:14 PM
views 153  views

शहरातील अरिहंत हॉस्पिटलने आता सर्वच विभागामध्ये आघाडी घेत आहे. रुग्णांना कमी त्रास, रुग्णालयातील मुक्काम कमी व रुग्ण लवकर बरा होण्याच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. नुकताच अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्त्वाखाली रोबोटिक पद्धतीने 64 वर्षीय वृद्धेवर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे अरिहंत हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून यापुढेही ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ. विक्रांत मगदूम व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता यापुढेही अरिहंत हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असून याचा हाडांच्या समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना लाभ होणार आहे. डॉ. विक्रांत मगदूम हे अरिहंत हॉस्पिटलशी करारबद्ध झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आल्याची पहिलीच बाब आहे.

ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान हे वैद्यकिय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रगती मानली जात असून याद्वारे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण लवकर बरा होतो व शस्त्रक्रिया झाल्यानंतर समस्येतून कायमची सुटका होते. आता अरिहंत हॉस्पिटलने अशा विविध व नावीन्यपूर्ण प्रगत तंत्रज्ञनावर भर दिला असून यामध्ये आघाडीवर आहे.  या प्रक्रियेमुळे आरोग्यसेवेत एक नवीन युग सुरू झाले असून आता हाडांच्या रुग्णांसाठी अरिहंत हॉस्पिटल वरदानदायी ठरत आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे बहुआयामी आहेत. ज्यामध्ये अचूकता, कमी चिरफाड, लवकर बरे होणे आणि रुग्णाच्या उत्कृष्ट परिणामांचा समावेश आहे.  डॉ. विक्रांत मगदूम म्हणाले, रुग्णांना सर्वोच्च रुग्णसेवा प्रदान करण्याची आमची बांधिलकी असून रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे अरिहंत हॉस्पिटलने नवीन उंची गाठली आहे, असे त्यांनी सांगितले.

ही रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात अरिहंत हॉस्पिटलचे यश वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकतेवर टिकून राहण्यासाठीचे त्यांचे अतूट समर्पण अधोरेखित करते. ज्याचा फायदा केवळ स्थानिक समुदायालाच होत नाही तर त्याच्या पलीकडेही विस्तार होतो. ही उपलब्धी केवळ हॉस्पिटलच्या यशाचे प्रतिबिंब नाही तर उच्चस्तरीय आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या दृढ वचनबद्धतेचेही प्रतिबिंब आहे. रुग्णालयाने प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सुरू ठेवल्यामुळे रुग्णांना इष्टतम रुग्णसेवा मिळण्यास मोठी मदत होत आहे.

सदर वृद्धेला गत 15 वर्षांपासून गुडघे दुखीचा त्रास होता. त्या 10 वर्षांपासून विविध औषधोपचार घेत होत्या. त्यानंतर 5 वर्षांपासून आयुर्वेदिक उपचार घेत होत्या. मात्र याचा गुडघेदुखीवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. विक्रांत मगदूम यांचे मोफत शिबिर भरविण्यात आले होते. त्यावेळी सदर वृद्धा गुडघेदुखीची समस्या घेऊन आली होती. त्यावेळी डॉ. विक्रांत मगदूम यांनी रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुडघे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी वृद्धेने याला मान्यता देत शुक्रवार दि. 27 ऑक्टबर रोजी हॉस्पिटलमध्ये भर्ती झाली. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी सकाळी वृद्धेवर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी वृद्धेला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली क्वचितच दोन्ही गुडघ्यांची एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्यात येते. डॉ. विक्रांत मगदूम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. आरजू नुरानी, जीवन नार्वेकर यांनी यशस्वी शास्त्रक्रिया केली  हॉस्पिटलचे चेअरमन सहका रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रुग्णांना एकाच छताखाली सर्व आरोग्यसेवा मिळाव्यात, या उद्देशाने आम्ही अरिहंत हॉस्पिटलची स्थापना केली आहे. आता हॉस्पिटलमध्ये अनेक विभाग सुरू झाले असून नुकताच गुडघे प्रत्यारोपण ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आम्ही प्रत्येक रुग्णाला सर्वश्रेष्ठ आरोग्यसेवा पुरवत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे असे सांगून डॉ. एम . डी. दीक्षित यांनी  रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या सर्व डॉक्टर व सहकाऱ्यांचे कौतुक केले.

गुडघेदुखी ही एक जागतिक आरोग्य समस्या ठरत आहे, जी जगभरातील लाखो लोकांना सतावतेय. वैद्यकीय प्रगतीमुळे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विकसित झाली असून हे एक नावीन्यपूर्ण तसेच अचूक तंत्र आहे, जे गुडघ्याच्या समस्यांपासून रुग्णांना आराम मिळवून देतात.

रोबोटिक-असिस्टेड सर्जरी ’रोबोट, इन्फ्रारेड सेंसर या माध्यमातून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर रुग्णाच्या गुडघ्याच्या हाडांची त्रिमितीय रचना तयार केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गुडघ्याची सविस्तर माहिती बारकाईने डॉक्टरांना मिळते. त्यातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना अगदी अचूक पद्धतीने जितका पाहिजे, तितकाच हाडाचा काप घेतला जातो. त्याची इजा स्नायूंना होणार नाही. त्या समतोल राहतील, याची प्रकर्षाने काळजी यात घेतली जाते.

रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याच्या अचूकतेमुळे आसपासच्या ऊतींना इजा होत नाही. यामुळे वेदना आणि सूज कमी होऊ शकते, पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत जलद पुनर्प्राप्ती शक्य होते. शस्त्रक्रियेनंतर ती व्यक्ती तिची दैनंदिन कार्ये अवघ्या काही दिवसातच पूर्ववत सुरू करू शकते. तसेच रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणासाठी पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत चिरफाड न करता लहान छिद्र पाडून केली जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी होतात आणि संसर्गाचा धोकादेखील कमी होतो.

रोबोटिकच्या साहाय्याने गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत वेदनारहित असून रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव होतो. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसे गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक अचूकतेने करता येत आहेत. जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी असंख्य रुग्णांकरिता रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हे एक वरदान ठरत आहे