बंदीवानांना अध्यात्माचा आनंद !

जिल्हा कारागृहात सुहास सातोसकर यांचं कीर्तन
Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2023 15:38 PM
views 65  views

सावंतवाडी : रोटरी क्लबच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असून सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी  सावंतवाडी जिल्हा कारागृहात स्वतः किर्तन सादर करुन बंदीवानांना अध्यात्माचा एक वेगळा आनंद दिला.यावेळी कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे, कारागृह अधिकारी श्री. मयेकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोसकर, सचिव रो. प्रविण परब, प्रदीप शेवडे, रो. अनंत उचगावकर, रो. अॕड. सिद्धार्थ भांबुरे, रो. अनघा रमणे, रो. राजेश रेडिज, रिया रेडिज आदी उपस्थित होते. 

         

सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. सुहास सातोसकर हे स्वतः इंजिनियर असुन ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. परंतु त्याना समाजातील उपेक्षित घटकाबाबत त्यांना आस्था असल्याने त्यानी आपला रोटरी क्लब अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ अभिनव उपक्रमानी साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने आपल्यात उपजत असलेली किर्तन कला सादर करण्याच्या आवडीतुन त्यांनी सावंतवाडी जिल्हा कारागृहात कीर्तन सादर करून भक्ती मार्गातुन बंदिवानांना मंत्रमुग्ध केलेच शिवाय त्यांचे अध्यात्मिक प्रबोधनही केले.

        

सुहास सातोसकर यांनी सादर केलेल्या या सुस्राव्य कीर्तनाला संगीत साथ रो. प्रदीप शेवडे (हार्मोनियम) यानी दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी नियोजन केले. यावेळी बंदीवानांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांचा विश्वाशी संबध कायम रहावा यासाठी दोन टेलीव्हीजन सेट सावंतवाडी रोटरी क्लबच्यावतीने सावंतवाडी जिल्हा कारागृहाला देण्यात आले.यावेळी कारागृहात कीर्तन कला सादर केल्याबद्दल तसेच बंदीवानांच्या मनोरंजनासाठी कारागृहाला दोन टेलीव्हीजन सेट दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सावंतवाडी रोटरी क्लबचे आभार मानले.