
कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ कुडाळ आयोजित 14व्या किर्तन महोत्सवाचे उदघाटन दिमाखात करण्यात आले. यावेळी गजानन कांदळगावकर, श्री सावंत प्रभावळकर, विनय वरदे, सदा सेन सावंत, यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि कीर्तनकार ह भ प चारुदत्त आफळे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले.
आफळे बुवांनी व्यासपीठावरील मारुती प्रतिमेचे पूजन व महर्षी नारद मुलींच्या प्रतिमेचे पूजन केले. मंडळाचे सदस्य सुरेश राऊळ सर्व वाद्य वृंदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्रास्ताविक उदय वेलणकर यांनी केले. रात्री 9:00 वाजता हभप आफळे बुवांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या चरित्रावर अगदी सखोल रसभरीत व आवेश पूर्ण किर्तन सादर केले कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.