कुडाळच्या उपनगराध्यक्षपदी किरण शिंदे बिनविरोध..!

Edited by:
Published on: September 01, 2023 15:55 PM
views 591  views

कुडाळ : कुडाळच्या उपनगराध्यक्षपदीकिरण शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिड वर्षे पुर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपुर्वी दिला होता. त्यामुळे हे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते.

या उपनगराध्यक्ष पदासाठीआज शुक्रवारी निवड होती.सत्ताधारी गटाकडून कीरण शिंदे यानी उमेदवारी दाखल केली तर विरोधी भाजपकडून उमेदवारीअर्ज दाखल केला नसल्याने निवडणूक अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी उपनगराध्यक्ष"पदी" किरण शिंदे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याचीघोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.